माझी लाडाची ग लाडाची राणी
माझी लाडाची ग लाडाची राणी
मन माझे येथे खूप भरुनी
दिवसभराचा त्रागा पाहुनी
तरी प्रेमवर्षाव करता हो धनी
म्हणूनी माझी लाडाची ग लाडाची राणी
कुटुंबाचे ओझे तुमच्या खांद्यावरी
आईवडिलांसाठी दिवसभर कष्टकरी
लाड पुरवण्या मुलांचे कमी ना करी
तरी म्हणे माझी लाडाची ग लाडाची राणी
असा माझा राग पटकन पळवूनी
नखरे माझे सगळे लाड पुरवूनी
धनी मला ओळखता किती हो आतुनी
मीच तुमची लाडाची ग लाडाची राणी
गर्व मला तुमच्या कामाचा हो धनी
करू उत्सव साजरा या कामगार दिनी
तुमच्या मिळकतीत मीच समाधानी
कधी रुसणार नाही तुमची लाडाची राणी
