STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

4  

sarika k Aiwale

Tragedy

माझी कथा तिची व्यथा

माझी कथा तिची व्यथा

2 mins
222

लहानपणीच मेली आशा जागण्याची

कथा एक अशी जपली माझी मनी

निळ्याशार आभाळात मेघ दाटती

पावसांच्या सरी नी धराही न्हाली

हिरव्या शालूत जणू खुलून हसली

नव्या नवतीची नुकतीच लालायी

गाली हसते जणू शानूली छकुली

डोळ्यात मावून घेते नभाला ही

अकाशीचा चंद्रमा खेळतो अंगणी

हसरी नाजूक ती कोणाची ग कोण ?

पुसे चांदण्या ही दुरूनी ..

कोवळ्या कांती ने सूर्याला दिपवेल

नजरेतील चमकने चंद्रप्रभा लाजेल

खळखळून हसू न कमालीचे सौदर्य

भारी लाजरी पण तेवढीच धीट ही

होती एक राजकुमारी छकुली छानशी

सगळे तीला जवळचे तरी

आई बाबा ला पारखी..

होते सगळेच तिचे तरी

बोलयला कोणी नव्हते

मैत्री तिची सार्याशीच होती

अश्रुंनी मात्र साथ नाही सोडली

प्रेम तसे सगळ्यानि च केले

पण पाठराखण दुख:नेच केले

चंचल नाजुक बाहुली मला

अलगद भूतकाळ सांगू लागली

डोळे पाणावले तरी कथा नाही संपली

किती होते साचले मनी ते आज कथिले

किती ओरबाड़े त्या जखमांचे तीने सोसले

होते सगळेच पण ऐकायला कोणी नव्हते

परी होती खरी ती झाली एक चित्तरकथा

नशिबाचया लेखणीने घात तीचा केला

खेळायचं होत तिला पण बालपण घेउन गेला

हसायच होत पण हासू संपवून गेला

असा एक श्रावण पाऊस त्यावेळी

तिच्याही अंगणी होता पडला ..

भिजली होती तेव्हा धरा अश्रूच्या थेंबानी

होते सगळेच तिचे पण आपले कोणी नाही 

उमजून तीने संपवले रडणे ..

केले स्वत:हालच कठोर जगली नको तरी पण..

तीच ती कथा घडते आजुबाजू आज ही

आजही परकी ती तिच्याच घरात

जन्मते वाढते जगते हसते सोसतेही

पण कोणच्यासाठी हेच तिला उमगले नही

लहानपणीच मेली अशा न उरली जागण्याची

अशी एक कथा जपली मनी जी ..

माझी कथा नसली तरी

होती एक माझीच सखी ती ..

तिची कथा ही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy