STORYMIRROR

siddheshwar patankar

Tragedy

4  

siddheshwar patankar

Tragedy

माझी बाहुली ओळखेनाशी झालीय

माझी बाहुली ओळखेनाशी झालीय

1 min
399

आज माझी बाहुली मला ओळखेनाशी झालीय

मी तोच, तिच्यासंगे लपाछुपी खेळणारा


मी तोच, तिच्यासाठी कधी हत्ती कधी माकड बनणारा

आज तिच्या अनोळखी नजरांमुळे, छाती भरून आलीय ॥


आठवतंय तुला का? तो बांधलेला झुला

खिळा मारताना हात रक्ताळलेला

तू दुडूदुडू धावलीस लेप शोधण्यासाठी

तुझी ती तळमळ बघुनी, जखम जागीच लोपली ॥


तुला काय देऊ नि तुला कुठे ठेवू?

दिनरात होतो, मी मग्न विचारात

तू दृष्टी, तू सृष्टी या दिन नेत्रांची

काय अपराध घडला की पडलो अंधारात ॥


मी बाप की पाप?, हा प्रश्न आता पडतो

तुझ्या आठवणीने आता कंठही सुकतो

नको बाळा नको वागू अशी तू माझ्याशी

तुझ्या वाणीस हे कान तळमळलेले,

बोल "बाबा", ये जवळी उराशी

किती वाट पाहू, तो क्षण आतुरलेला

श्वास जड झाला आत्मा कोमेजलेला ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy