STORYMIRROR

Aruna Garje

Children

3  

Aruna Garje

Children

माझी आई

माझी आई

1 min
158

अगं अगं आई

थांब ना गं बाई

आळस कसा तुला

ठाऊकच नाही


सकाळी उठते

अंगण झाडते

बागेला पाणीही

तूच बाई घालते


आंघोळपांघोळ 

देवाचीही पूजा 

तरी सुद्धा तुझा 

नाही गाजावाजा 


स्वयंपाक छान 

तू करते सारा 

जेवणा नंतर 

आवरी पसारा 


आवरा आवरी 

मग भांडीधुणी 

तरीही कौतुक 

का करेना कुणी? 


अभ्यासही घेते 

म्हणते अंगाई 

भारीच आवडते 

मला माझी आई 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children