STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational Others

3  

VINAYAK PATIL

Inspirational Others

माझे स्वप्न

माझे स्वप्न

1 min
138

फुलांना या पाहतांना 

स्वप्न माझे बहरावे 

ओंजळी दरवळणाऱ्या 

सुगंधात विसरावे ||१|| 


तुझे हास्य पाहूनीया 

स्वप्न माझे खुलवावे 

खळी खिले गालावरी 

रूप तुझे निखरावे ||२|| 


कोवळ्या किरणातूनी  

स्वप्न माझे जागवावे 

पंख लावूनिया नवे 

क्षितिज स्पर्श करावे ||३|| 


प्रेमाच्या मायेत तुझ्या 

स्वप्न माझे झुलवावे 

नात्याच्या या बंधातूनी  

मी जगणे शिकवावे ||४|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational