STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Tragedy

3  

Rajendrakumar Shelke

Tragedy

माझे सुपरस्टार बाबा

माझे सुपरस्टार बाबा

1 min
228

मला खूप काही दिले

माझ्या प्रिय बाबांनी,

क्षण सारे आठवताच

डोळे भरतात आसवांनी.

मी खरंच भाग्यवान आहे

ज्यांनी मला आयुष्य दिल,

त्या बाबांच्या खऱ्या प्रेमात

मला जगण्याचं बळ मिळालं

तुम्ही सोबत असताना

मी खूप काही शिकलो,

तुमचीच प्रेरणा घेऊन

संकटांशी या खरा लढलो.

शैक्षणिक सामाजिक कार्य

याची जाणीव तुम्हीच दिली,

माणसातील माणूसपण खर

जगण्याची ताकद अंगी भरली.

बाबा तुम्हीच माझे आदर्श

तुम्हीच दाखविला मार्ग,

नेहमीच मनात दरवळतो

संस्काररुपी आनंदी स्वर्ग.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy