माझे बालपण
माझे बालपण
1 min
365
दिवस बालपणाचे
गोड आठवणींचे
जगलो मनमुराद
परी रोष ना कोणाचे
खेळलो बागड्लो जरी
घडलो अनमोल संस्काराने
जपली भूतदया ही
निरागस भाव होते मनाने
मतेमतांतर मनीमणीची
व्यक्तीपरत्वे बालपण अजाण
कधी पुरवला जातो हट्ट
कधी होते बालमजुरीणे हैरान
कधी ग्रहण लागते बालपणाला
निरागसता जाते चुरगळली
पाठ ना सोडे गरिबी तयाची
बंधने बांधली जातात समाजातली