माझा शेतकरी राजा...
माझा शेतकरी राजा...
माझा शेतकरी राजा, पिकवताे घामातून माेती
तरीही हाेतेे वाताहत, कष्टाची होती माती
माझा शेतकरी राजा, राजा असून उपाशी
टाळूवरचे लाेणी खाता, काही खातात तुपाशी
माझा शेतकरी राजा, जागाेजागी भरडताे
फाटकेच वस्त्र लेवून, मन मात्र माेठे करताे
माझा शेतकरी राजा, बदल आता घडवताे
सरकारी याेजनांमुळे, थाेडा पुढे सरकताे
