STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4  

Sunita Ghule

Inspirational

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र

1 min
392



माझा महाराष्ट्र


सह्यगिरीच्या कडेकपारी

विस्तीर्ण दख्खन पठार

झुळझुळणारी सरिता पात्रे

हिरवाईचे मनोरम्य आगार।


पावनभूमी माझा महाराष्ट्र

शिवरायांच्या पद कमलांनी

जिजाऊंचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम

रक्त उसळते शब्द सुमनांनी।


थोर संत गुरू परंपरा

पोवाडे, अभंग गोडवे गाती

स्वातंत्र्यासाठी रूधीर शिंपूनी

वीरांनी पुलकीत केली माती।


देशाच्या सत्ता, समाजकारणी

प्रभावी माझी मुंबापुरी

वीर,लोकनेत्यांची भूमी

संस्कृतीचा डंका त्रिखंडावरी।


पाणी,मृदा प्रदुषण नियमन

गरज बनली आज काळाची

संपन्न,सुजलाम् ठेवूनिया

राखू शान माझ्या महाराष्ट्राची।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational