माझा होशील ना?
माझा होशील ना?
तुझ्या प्रीतीचे कुंकुम ल्याले
तुझी अर्धांगिनी झाले
नाव गाव सोडून सारे
तुझिया मागुन आले
दोन तपाची तपश्चर्या
आली ती फळाला
दोन देखणे दिपक
दिधले तुझ्या कुळाला
तुझ्या सुखदुःखाची साथी
तू दिपक मी ज्योती
शतजन्मीचे बांधून नाते
ऊध्दरुनी दोन्ही कुळाते
तुझ्या सोबतीने पार करेन
संसाररुपी सागराला
शब्दसुमने अर्पुनिया
व्यक्त केल्या भावना
सांग तू माझा होशील ना

