STORYMIRROR

Sanjeev Borkar

Inspirational Others

4  

Sanjeev Borkar

Inspirational Others

माझा छंद

माझा छंद

1 min
187

माझा छंद कविता करण्याचा

चुलीतला तप्त निखारा बनून 

भाकरी सारखा पोळण्याचा

भुकेल्यांसाठी अश्रु बनण्याचा


माझा छंद सागर बनून

साऱ्या नद्यांचे दूषित पाणी 

स्वतः पिऊन तृप्त होण्याचा

तळाची विशालता जपण्याचा


"संविधान" वाचविण्याचा

"लोकशाही" टिकविण्याचा

माझा छंद माणसातील

जिवंत माणूस जगविण्याचा


साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

फुलविण्याचाही माझा छंद

आणि एक नवीन सशक्त 

"भारत" घडविण्याचा माझा छंद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational