STORYMIRROR

Falguni Dhumale

Drama Others

3  

Falguni Dhumale

Drama Others

माहेर..

माहेर..

1 min
279

खेळत होते, उडत होते, कामे सुद्धा करत होते..

माझ्या जगात रमत होते, मोकळा श्वास घेत होते..

पण, आज काय ही बातमी आली..

म्हणे, 'मुलगी' आता मोठी झाली..

पाटी पुस्तके सोडवून दिली.. सर्वच स्वप्न पाण्यात गेली..


लग्न केले, स्वप्न बघितले, माहेराहून सासरी आले..

लोक बदलले, घर बदलले.. कामेही आता वाढतच गेले..

'आमच्या वेळी असे नव्हते' म्हणत, घरात कुर-कुर सुरू झाली..

अहो, यांचे नेहमीचेच.. अजून कशी नाही मुले झाली..?


कसाबसा पाळणा हलला.. 'कृष्ण' यांना वाटू लागला..

भांड्यांची आदळआपट करताना, मलाही काहीसा भासू लागला..

दोनच वर्षात बघते, तर, आमची 'मैना' ही घरी आली..

एकाला एक म्हणत, ती ही दंग्यात सामील झाली..


खाऊ-पिऊ घातले, मोठी झाली..

धिंगाणे झाले, मस्ती झाली..

अभ्यास झाला, शाळा झाली..

म्हणावे तेवढी मोठी झाली..

अंगा पासून दूर गेली..

आपापले जगण्यात व्यस्त झाली.. 


आतातरी जगता येईल म्हटले, तर यांची 'शुगर' पुढे आली..

आयुष्याची बरीच वर्षे, दवाखान्यातच निघून गेली..

असे किती उन्हाळे उलटले.. पूजा, सणवार निघून गेली..

पण, यांचे तोंड उलायचे नाही, की तू किती वर्ष झाले, माहेरी नाही गेली..?


एकदा मी पण हट्टच केला, राग आकाशापर्यंत पोहोचला..

एवढी वर्ष अडकून पडले, आता हिम्मत करून बोलू लागले.. म्हंटलं, येताय बरोबर ? की जाऊ एकटीच माहेरी?

तर पहिला प्रश्न विचारल्या गेला, कधी येशील माघारी?

त्यांनी कारणे शोधायला सुरुवात केले..

मी बॅग भरून निघून गेले..


वाटले आता तरी जगावे थोडे.. मोकळ्या हवेत परत आले..

सगळेच चित्र बदलले होते.. तेही आता म्हातारे झाले..

त्यांना बघताच भारावून गेले.. जणू सगळीच दुःखे नाहीसे झाले..

....

पण खरंच मनापासून विचारायचे होते,

इतक्या वर्षात भेट नाही, का हो एकदाही माझी आठवण नाही आली? 

स्वतःचीच असून, अशी कशी हो मुलगी परकी झाली..??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama