ध्येय..
ध्येय..
समुद्राच्या लाटांशी वाद घालताना, उगाच डोळे झाकावे..
क्षितिजाशी मैत्री करून, विश्व कवेत भासावे..
निळाईत त्या नीलांबराच्या, मनसोक्त बुडून जावे..
तर कधी उंच भरारी घेऊन, आकाशाला बिलगावे..
... भविष्यातील उदात्त जगात, रमताना छान वाटावे..
स्वप्नांशी झुंजताना, दुःखाला हसून कवटाळावे..
शरीरात काटे बोचताना, मन तल्लीन होऊन जावे..
आज विचारांच्या आडोशाला, भूतकाळाचा थारा नसावे..
मनाच्या कोपऱ्यात दूरपर्यंत, कसलीही भीती नसावे..
आज माझ्या हृदयात, कुठलीही इच्छा नसावे..
आणि पापण्यांमागे दडलेले, अश्रूंचे ओझे नसावे..
वर्षानुवर्षे झोपलेल्या त्या पहाटेला, वाचा फोडावे..
दिवसातील प्रत्येक क्षणाने, उठाव करून जागावे..
अंधारलेल्या रात्रीला सुद्धा, तोडण्याचे बळ असावे..
संधीलाही परत परत यावे वाटेल, असा ध्यास धरावे..
हरण्यापेक्षा मरणे सुद्धा, अगदीच जवळचे वाटावे..
माझे प्रत्येक पाऊल, फक्त तुझ्याच दिशेने पडावे..
रस्त्याची पर्वा केल्याशिवाय, बसत, उठत, चालत, धावत, पोहोचावे..
प्रयत्नांचे ओझे वाहून, ध्येयालाही लाजवावे..
आणि.. त्याच्याहीकडे, आज मला जिंकवल्याशिवाय, कुठलाही पर्याय नसावे..
