STORYMIRROR

Vrushali Khadye

Inspirational

2  

Vrushali Khadye

Inspirational

म.न.पा.शाळेत जाऊ!

म.न.पा.शाळेत जाऊ!

1 min
259

चला जाऊया म.न.पा.शाळेत

सर्वांगीण विकास करण्यास...||धृ||


नको पुस्तके, नको वही

म.न.पा. आम्हां सर्व देई

आनंददायी शिक्षण घेऊया

शिक्षकांसह आपण नाचूया...||१||


दप्तराचे ना आम्हां ओझे

चित्रांनी सा-या भिंती सजे

पोषण आहार खाऊया

तंदुरुस्त आपण होऊया...||२||


शिक्षक कलांचे आगार

जीवना देती आकार

रोज शाळेत येऊया

उपस्थिती भत्ता मिळवू या...||३||


तंत्रज्ञानाची साधने आली

सेमी इंग्रजी शाळा झाली

जगाची भाषा शिकूया

जागतिक कीर्ती मिळवूया...||४||


नवोपक्रम नित्य राबवी

ई-लर्निग सदा शिकवी

स्पर्धामधे भाग घेऊया

उज्वल यश मिळवू या...||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational