म मराठीचा
म मराठीचा
म मराठीचा
वाटतो आपुलकीचा
इंग्रजीचा ना द्वेश करावा
संयम स्वतःवर ठेवायचा
वक्ते ते पहा नेहमीचे
मराठीत भाषणे ठोकतात
इंग्रजी शाळेत का मुले
त्यांचीच हो शिकतात
वाचन, लेखन, मनन, चिंतन
कोण आता करत बसेल
कॉपी पेस्ट मग मराठीतून
तोरण दाराचे असे तुटेल
