लुप्त कुठे गं
लुप्त कुठे गं
जीव माझा हा कुठे गं
सांग राणी तू कुठे गं
शोध घेता रान सारे
बोल ना प्रीती कुठे गं
आज डोळ्यांना कळावे
छंद लावूनी कुठे गं
का परीक्षा घेत आहे
प्राण नेणारी कुठे गं
अंत पाहू काळजाचा
प्रेम देणारी कुठे गं
ह्या मनाला कसे सांगू
गीत गाणारी कुठे गं
गाठ बांधूनी जपावी
रूप सोनेरी कुठे गं