STORYMIRROR

Janhavi kumbharkar

Inspirational

3  

Janhavi kumbharkar

Inspirational

लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min
35

लॉकडाऊन झाले, 

मला वाटले बरेच झाले, 

थोडा वेळ का होईना, 

माझे छंद नव्याने जोपासता आले


घरातली सगळी मंडळी, 

यानिमित्ते एकत्र जमली, 

मुला-बाळांमध्ये पाहा, 

चांगलीच रमली


मलाही मिळाला थोडा 

मी टाईम आता, 

एकांतात बसायला, 

उसंत कुठे आता


लेखणीने घेतली माझ्या, 

भरारी अगदी छान, 

चार चौघात मिरविण्याचा, 

मिळाला मला मान


सतत स्वयंपाक घरात, 

प्रयोग सुरु झाले, 

झूमच्या लिंकवर,

क्लास भरत गेले


शाळासुद्धा सुरू झाली, 

ऑनलाईन आता, 

रोज रोज लिंक भरून, 

सवड मिळेना आता


टीव्हीत रमण्याऐवजी, 

मुलांमध्ये रमलो, 

भातुकली, चल्लस, चोर चिठ्ठी, 

सारे काही खेळलो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational