STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

3  

Prashant Tribhuwan

Inspirational

लक्ष

लक्ष

1 min
612

लक्ष्य


ठरवले जीवनाचे लक्ष्य

त्यासाठी नित्य झिजावे ,

आपण जागावे रात्री

आणि साऱ्यांनी निजावे !


करावे इतके कष्ट लक्ष्यासाठी

यश चरणी आपल्या रुजावे ,

मेहनतीचे फळ आपल्या

आई बापाच्या माथी सजावे !


साऱ्या कुळाचे नाव आपल्या 

तिन्ही लोकी असे गाजावे ,

नियती लिहिताना नशीब

तिने देखील लक्ष पाहून लाजावे !


यशाचे शिखर गाठण्यासाठी

दुबळ्या मनास कष्टाचे अमृत पाजावे ,

मात्र एक गोष्ट आय द्यावी ध्यानी

लक्षाशिवाय या जगातून न जावे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational