लेखनाची किमया
लेखनाची किमया


जेव्हा श्रवण, भाषण, वाचन कौशल्ये पूर्ण होते,
तेव्हा लेखनाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात होते||
सृजनशील लेखनाचे कौशल्य अवगत होते,
तेव्हा मनातील भाव कागदावर उतरीत होते||
जे काही ऐकले, वाचले अवगत झाले होते,
त्यांचेच लेखन करुन ते लिहून काढत होते||
रंग लेखनीचे जेव्हा कागदावर उतरत होते,
शब्द मुकेही अर्थ देऊन जात होते||
शब्दाला शब्द जुळले की लेखन तयार होते,
मनातील भावनांचे लेखन करून लेख तयार होते||
लेखन कौशल्यासाठी आत्मानुभव आवश्यक आहे,
जे लिहायचं असते त्याची माहिती आवश्यक आहे||
एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ज्ञानाचे स्थलांतर करते,
एका व्यक्तीच्या विचारांना लोकांमध्ये प्रसारीत करते||
लेखन चांगले असल्यास लेखक, कवी, पत्रकार बनता येते,
शब्दांच्या खेळीने दुसऱ्याचे मनही जिंकता येते||
कविता, चारोळी, निबंध, स्फूट लेखन लिहिता येते,
आपल्या व्यक्तीमत्त्वाने आपला प्रभाव दाखवता येते||
मनातले बोलता येत नसले तर लिहून दाखविता येते,
आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी लेखन उपयुक्त होते||