STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

4  

Dilip Yashwant Jane

Tragedy

लेक

लेक

1 min
430

काय असते मुलगी

हृदय असतं बापाचं

खळखळ वाहणारं

पाणी असतं झऱ्याचं


लेक असते काळीज

एका हळव्या बापाचं

देते सुगंध घराला

झाड जसं प्राजक्ताचं


लेक उंबरा घराचा

श्वास आईचा असते

नातं मायलेकिचं हे

अवचित रे फुलते


लेक असते लाखात

परी शोभून दिसते

तिच्या रूपात पाऊल

देवी लक्ष्मीचे लाभते


लेक असते आधार

घरा वयस्क काठीचा

आजी आजोबाही दंग

लाड करण्या नातीचा


लेक असते रे खुशी

वाट सारी समृद्धीची

होई पूर्णची मनिषा

सुख अन् प्रगतीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy