STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy

3  

Pavan Pawar

Tragedy

!! लेक काळ्या आईचा !!

!! लेक काळ्या आईचा !!

1 min
231

शेतकऱ्याच्या नशीबी माती शेतकऱ्याचे भाग्य रे,

बारा - माही राबतो शेतात नाही त्याची जात रे

देश धर्म राजनितीच्या पायी होई त्यावर आघात रे,

शेतकऱ्याच्या नशिबी माती शेतकऱ्याचे भाग्य रे


पीक उधळती, उधळती जसे लाखो श्र्वानात एकच घास,

कष्ट जाते वाऱ्यावर त्याचे वादळात जसा असतो प्राण

लक्ष्मीच्या दागीण्यावरही नाव लिहीले सावकाराचे रे, 

शेतकऱ्याच्या नाशीबी माती शेतकऱ्याचे भाग्य रे


बाप राबतो उन्हात जसा भाकर भाजते तव्यावर,

लेकं फिरतो घेऊन झेंडा नेत्याच्या त्या पायावर

कधी रे कळणार तुझी परीस्थीती तुझ्याच त्या राजाले,

शेतकऱ्याच्या नशीबी माती शेतकऱ्याचे भाग्य रे


नाही माहीत हक्क स्व:ताचे नाही जाणे अधिकार,

मिळे मदत कवळीसमान ती कष्ट ज्याचे असे अपार

परीस्थीतीला त्रास देऊनी लक्ष्मीचे कपाळ का पुसतोस रे,

शेतकऱ्याच्या नशीबी माती शेतकयाचे भाग्य रे


शेजारी-पाजारी येती घेऊनी सांत्वनेचा भ्रमित भाव,

मनात काम वासना असे डोळ्यात त्यांच्या उपद्रव

तुझ्या कुटुंबाला तुझा मूर्ख विचार ऐक कसा कोपणार रे,

शेतकऱ्याच्या नशीबी माती शेतकयाचे भाग्य रे


नागड्या कपाळाच्या स्त्रीला मान नाही देतो हा समाज,

अनाथ मुलगी दिसतात वेशीवर दुःशासनचा होतो भरमार

ऐकून घे हे कडू सत्य सांगतो तुला मी गजपुत रे,

शेतकऱ्याच्या नशीबी माती शेतकयाचे भाग्य रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy