लावण्याचे तेज
लावण्याचे तेज
नयन निरागस ओठ बोलके
गाली शोभे गोड खळी
लावण्याचे तेज पसरले
चैतन्याची अनुपम झळाळी
चुडा घातला हातामध्ये या
गळा मोत्यांची माळ शोभली
आरसपाणी सौंदर्याने
रुपास या चकाकी लाभली
कानी सजे कुंडलांची प्रभा
काजळ नयनी ओठी लाली
तुझ्या सुखात सजूनी
चंद्रकोर ती खुलली भाली
प्रतिबिंब तुझे दर्पणात
हास्याची लकेर मोहक गाली
केशसंभार दरवळला
बांधूनी कुंदकळ्यांच्या वेली
मराठी संस्कृतीचा मान
नाकी मोत्यांची नथनी
गुलाबी-केशर साडीत
शोभून दिसे लावण्यखणी
साज तुझा शृंगार तुझा
भुलवी सख्याच्या गं मना
नांदो आयुष्यभर सुखाने
पूर्ण होवो तव मनोकामना
