STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

2  

Bharati Sawant

Romance

लावणी

लावणी

1 min
166

नकाच भटकू राया सखया येतेय बघा मी न्हाऊन

घेरलं प्रेमानं तुम्हां करते मी आताच लॉक डाऊन ||धृ ||


वाढलाय आता धोका 

चुके काळजाचा ठोका

नका सोडू तुम्ही मोका

घेऊ संगतीने झोका


मोकाट सुटलेत कोल्हे लांडगे या ना हिसका दावून

घेरलं प्रेमानं तुम्हां करते मी आत्ताच लॉक डाऊन ||१||


आलंय बंधन मला

बाई सांगू मी कुणाला

जपावं माझ्या मनाला

या पिरतीच्या फुलाला 


नकाच जाऊ सोडूनी राया मला अंगठा तुम्ही दावून

घेरलं प्रेमानं तुम्हां करते मी आत्ताच लॉक डाऊन ||१||


प्रेमाची झाली आखणी

गंभीर नाहीच कुणी

झाला कहर हो राया

मोहरली माझी काया


नवतीचा शिणगार करुनी आलेय सख्या मी धावून

घेरलं प्रेमानं तुम्हा करते मी आत्ताच लॉक डाऊन ||१||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance