लावणी
लावणी
गूज करते चंद्र चांदणी निरव शांतता रात थिटी sss
भिनला तु ssअंगी ss या हो राया मी राहू कशी एकटी ss
कमळा नेही मिटली पाकळी
भुंगा निजला जाईल सकाळी
मी सजले नटले तुझ्याच साठी
भिनला तुsss अंगीss
.या हो राया मी राहू कशी एकटी...
सुगंध दरवळे मी रात राणी
लूकलुकीत नभिची मी चांदणी
लवलव करी नयन पाकळी लावा
हो टीळा कुंकवाचा ललाटी sssss
या हो राया मी राहू कशी एकटी........
वाट पाहुनी मी थकले दमले
बांधून झाले मनीचे इमले
याना हो लवकर बसा मंचकी
लावा मेखला कटी sss
या हो राया राहू कशी एकटी...
तुमच्या माझ्या प्रेमाच्या गाठी
सोडू नका हो हाताची मिठी
बसा गड्या बसवा सुखाची घडी
टाकू नका हो अटी sss
या हो राया राहू कशी एकटी....
गुंज करते चंद्र चांदणी निरव शांतता रात थिटी..
भिनला तु .....अंगी...या हो राया राहू कशी एकटी....

