STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy Inspirational

लालपरी तू एस.टी

लालपरी तू एस.टी

1 min
506

लालपरी तू एस.टी

केंव्हा सुरू होशील

गोरगरिबांना बसवून

गावोगावी तू नेशील....!!


तुझ्यामुळे होते दैना

इथे रोज गरीबाची

एसीत बसणा-यांना

ना खंत आहे त्यांची....!!


गोरगरीबांची तू लालपरी

दीड वर्षापासून तू बंद

कोणी नाही का वाली?

सारे आपल्याच धुंदीत धुंद.....!!


खेडोपाडी, गावोगावी

तूच लालपरी दिसायची

सानथोरांसहित घेऊन

गावोगावी फिरायची.....!!


खाजगी त्या वाहनांना 

आता फुटलेत बाई पेव

लाल परी बंद झाली तर

गोरगरिबांना आहे भेव....!!


खाजगी वाहनांचे आता

तिपट्टीने तिकीट वाढले

गरिबांच्याच मुळावर

असे विपरीत घडले......!!


लालपरी तू एस.टी

लवकर हो बाई सुरू

पगारवाढ होईल नक्की

फक्त आत्महत्या नका करू...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action