STORYMIRROR

Neelima Deshpande

Tragedy

3  

Neelima Deshpande

Tragedy

लाखो क्षितिजे विरली....

लाखो क्षितिजे विरली....

1 min
181

क्षितिजा वरती एकाकी मी 

आज प्रतिक्षा तुझीच करते

आगमनास्तव तुझिया आता 

अवघे जीवन माझे उरते.


निळयाशार त्या सागर किनारी

क्षितिजा वरती उधाणवारे

आसमंती त्या वसंत मासी

व्यर्थच भासे तुजविण सारे.

 

भास जन्मती भासातूनही

विरह न सीमा माझी झाली 

प्रतिक्षेत त्या तुझिया अवघी

लक्ष लक्ष ती क्षितिजे विरली!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy