STORYMIRROR

Sushama Gangulwar

Abstract

4  

Sushama Gangulwar

Abstract

लागे चाहूल थंडीची

लागे चाहूल थंडीची

1 min
407


लागे चाहूल थंडीची 

येई अंगास शहारा 

गाढ स्वप्नात रंगण्या 

नवा थंडीचा बहाना.....


पहाटेचा थंड गारवा 

दिसे निसर्ग हिरवा 

झोमे हळुवार अंगा 

शांत वाहणारा हवा......


गर्द गवतावरती

शोभे दवबिंदू मोती 

पहाटेच्या या स्वप्नात 

सख्या रंगली प्रीती......


धुरक्याने झाकलेले 

छान थंडीचे पहाट 

दूर नजर टाकता 

अंधूक दिसे वाट.....


उभ मिळवण्या अंगा

शेकोटीचा लाभ घेई 

थंड गारव्या पासून 

थोडा विसावा देई.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract