लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
पडले परत लाॅकडाऊन
आज बंद झाले जीवन,
संपला गंध जीवनाचा
चार भिंतीत कोंबून..!!१!!
उरल्या नाही इच्छा
ना कशात वाटे रस,
मृत्यूसत्र पाहून आज
वाटे देवा कर आता बस..!!२!!
कोरोनाचे राज्य वाढले
योद्धा ही सारे ढासळले,
कोरोना दूत वाढतच गेले
आम जनतेला वेढून टाकले..!!३!!
कसले आले भोग आता
हसावे की रडावे यात,
खूप सारे फायदे तोटे
लाॅकडाऊन पण ना करी मात..!!४!!
सगळेच आज दबकले
जीवनाचे रंग उडून गेले,
टाहो सगळ्यांचा ऐकून
मन ही कासावीस झाली..!!५!!