STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

3  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

लाडकी लेक

लाडकी लेक

1 min
156

तु आलीस आणी, सगळं काही बदललं

अमंगळ सारं ते काही, असं धुऊन गेलं


रडणं तूझ आता, कानांना देतो माझ्या गोडवा

तूझ्या सोबत असणं, हाच माझा पाडवा


छोटे छोटे ओठ तूझे, जांभई देताना हलकासा गोलाकार येई

रूप तूझे साजरे बघताना, अलगद डोळ्या पानी येऊन जाई



केवढा तो राग अगं, पाहून मला हसायला येतं

वाटतं सारखं तुला चिडवावं, असं आपलं नातं



तु यावं रडावं रागवावं, बोलावं आणी भांडावं माझ्याशी

सारे लाड पुरउण तूझे, कायम हरावं तुझ्याशी



शब्द संपले बाळा, तूझ गाणं गाताना

बाबा सतत स्वप्न पाहतो, तु जवळ येताना



बोबडे शब्द तूझे, आता मला स्पष्ट समजतील

हाव भाव ते सारे काही, तूझे लक्ष्यात माझ्या येतील



तूझ्या येण्याने, आयुष्याच्या सुखाची रोवली अशी मेख

माझ सारं काही माझ्यासकट, लाडकी माझी लेक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance