कविता
कविता
कविता म्हणजे काय
शब्दांची जुळणी नसते
तुुुुुुुुमच्या माझ्या जीवनातल्या
अनुभवांंची उजळणी असते.
कविता, मनातल्या सुुुरांचा
ओठी आलेेला झंकार असतो.
व्यक्त व्हायच्याया मानसिक गरजेेेचा
अस्वस्थ करणारा हुंंकार असतो
कविता म्हणजे कवींच्या
मनातलं पौर्णिमेचं चांंदणं असतं
प्रेरणेतून स्फुरलेल्या शब्दाच्या
चिरेबंंदी वाडा बांधणं असतं
