कविता कशी असावी
कविता कशी असावी
आईचं वात्सल्य दूध
पाजणारी कविता असावी
बापा सारखं धीर देणारी
नेतृत्व शिकवणारी असावी
डोळ्यातील आसवांना वाट
दाखवणारी कविता असावी
भावनांना व्यक्त करणारी
भावपासातून सोडवणारी असावी
ज्ञानाची सरिता बनून वाहणारी
ज्ञानाने परिपूर्ण असावी
बुद्धी ला रुजवून
मन देहाला आनंद देणारी असावी
निसर्ग पूजक कविता
मातीचे ऋण फेडणारी असावी
मानवतेच्या कक्षेत बसून
सर्वाना सुखवणारी असावी
समाज शिक्षक बनून
ती एक शिक्षक असावी
कच्या माटीतून संस्काराचे
पक्के मटके बनवणारी असावी
कविता ही ज्ञानामृत
कविता हे आनंद
कवितेने सुगंध बनून
जागवावा मनातील स्वानंद
