कवडसा
कवडसा
कवडसा माझ्या मनीचा
सांग ना तुझ्या जीवनी
कधी उमटेल का..?
माझ्या मनीचे गुज
कधी तुला समजेल का..?
प्रीत ही माझी अबोली
कधी तुझ्या दारची
प्राजक्त होवून बहरेल का..?
गुंफून जाई-जुईचा वेल
मोगरा अन् रातराणी सवे
सुगंध हा सर्वत्र पसरेल का..?
कवडसा माझ्या मनीचा सांग ना
तुझ्या जीवनी कधी उमटेल का...?
तोडून पाश सारे काळोखाचे
कवडसा हा प्रकाशाचा उजेल का..?
