STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

कुटुंब जोड वेळ...!

कुटुंब जोड वेळ...!

1 min
411

शु क्राची चांदणी तू

क्र मांक एक तुझा सौन्दर्यात

वा टलं होतं मला कधी

र मून जाव तुझ्या मनात...


वि श्व सारे सामावले होते 

श्वा सात तुझ्या ग माझे

सा धे सुधे प्रेम जडले होते

चा वट पणाचे वागणे पाहून तुझे...


तुझा टिपक्या टिपक्यांचा फ्रॉक

मन म्हणायचे लेका रॉक

तुझ्या गुलाबी जिभेला नव्हते हाड

तरीही वाटायचे मला ते सारे गॉड....


तू जाता जाता म्हणायचीस बावळट

साधा सुधा मी तुला वाटायचो खुळचट

असायचेच ना माझे ध्यान मळकट

तरी तुलाही आवडायचे ते रूप कळकट...


अशी नशिबाने थट्टा मांडली

सारी नियतीच जणू सांडली

सौभाग्याची रेखाच गंडली

दुर्दैवानेच ती उखळात कांडली...


आज सारा इतिहास आठवला

जो आजवर मनी साठवला

म्हंटले पल्ला मोठा ग गाठला

पण तुझा हात नाही भेटला....


तू तुझ्या घरी असशील मस्त सुखात

म्हणशील असेन मी माझ्या घरी दुःखात

पण खरं सांगू रोज असते हरीनाम मुखात

मी ही आहेच ना ग त्या दुःखातही सुखात...!


वेळ माझी खरोखरच ग चांगली म्हणुनी

जोड जीवनी सुरेख लाभते

कुटुंबात माझ्या सौख्य समाधान शांती

सौभाग्याच्या साथीने लीलया नांदते....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational