कुठे गं माय !
कुठे गं माय !
मायमाऊली
माझी सावली
आयुष्यभर
मागे ठाकली
अगं ए आई
मी दादा ताई
विश्वच तुझे
तू गं समई
तू कल्पतरू
तू महामेरू
आमच्यासाठी
सौख्य सागरू
तू जन्मदात्री
गीता गायत्री
तूच आमची
मायेची छत्री
तुज जननी
विठाई जनी
सदैव तुझा
हृदयी ध्वनी
तूच जन्मदा
तूच स्वरदा
आभाळमाया
आणि वरदा
कुठे गं माय
दिसत नाय
प्रतिभाग्रज
मोकले धाय
