कुठे चुकताे माणूस....
कुठे चुकताे माणूस....
कुठे चुकताे माणूस घेत नाही ध्यानात,
स्वार्थाचाच विचार कायम त्याच्या मनात...
कुठे चुकताे माणूस नाही सहकार्याचा हात,
संधी साधून माणूस करताे आपल्यांचा घात...
कुठे चुकताे माणूस अपेक्षा त्याच्या अवास्तव,
नेहमीच आपला चाैकाेन समजत नाही वास्तव...
कुठे चुकताे माणूस सतत घालताे घाव,
समाेरच्याचे ऐकत नाही त्याच्या लेखी नसताे वाव...
