कुशीत त्याच्या मी शेवटचे क्षण अनुभवावी
कुशीत त्याच्या मी शेवटचे क्षण अनुभवावी
पाऊलवाट ओळखीची असावी त्या
त नागमोडी वळणं नसावी
प्रवाहाला संथ सात असावी
वादळाची भीती त्यात नसावी
हरवलेल्या स्वप्नांना जगण्याची आस असावी
बेभान मनाला कोणाची पर्वा ही नसावी
विनलेल्या नात्याला प्रेमाची ऊब असावी
अविश्वासाची खोली न कधी त्यात दिसावी
कळत नकळत फुलांची उधळण व्हावी
कुशीत त्याच्या मी शेवटचे क्षण अनुभवावी .

