कुणीतरी माझ्या प्रेमात पडावं
कुणीतरी माझ्या प्रेमात पडावं
कधीतरी असं घडावं
कुणीतरी माझ्या प्रेमात पडावं
तिने हळूच माझ्याकडे बघावं
मी माघारी बघितल्यावर तिने हळूच लाजावं
भर पावसात दोघांनीही चिंब भिजावं
गालातल्या गालात तिने हळूच हसावं
कुणीतरी मजवर प्रेम करावं
तिला चिडवल्यावर तिने रूसावं
मी तीला मनवण्यासाठी हळूच फुल द्यावं
तिच्या प्रत्येक ठोक्यात मीच असावं
स्वप्नातही मीच दिसावं
असं कुणीतरी माझ्या प्रेमात पडावं

