STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

4  

Sanjay Dhangawhal

Inspirational

कुंकू

कुंकू

1 min
264

लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी

साहेबांचा फोन आला

सिमेवर चकमक सुरू झाली

आणि मी लगेच निघालो

जाताना मागू वळून बघण्याची हिंम्मत झाली नाही

ती तशीच धावत आली

पाठीमागून मिठी मारली

परत कधी येणार म्हणून

विचारू लागली

सांगता आले नाही


पण....

तिच्या पदराला परत येण्याच वचन बांधून

एक मात्र निश्चित सांगितले

परत आलो तर पुन्हा

तुझ्या कपाळाला कुंकू लावीन

तुझ सौभाग्याच रूप

डोळे भरून पाहीन

मी येईपर्यंत कुंकू सांभाळून ठेव


वर्ष निघुन गेले ती तशीच

कुंकू जपून वाट पहात होती

मी जेव्हा परत आलो तेव्हा

तिच्या पदराला बांधलेली

वचणांची गाठ सोडली

आणि लावले तिने सांभाळून ठेवलेले कुंकू

तिच्या कपाळाला


आताकुठे मुलगा मोठा झाला

बापाशी बोलायला लागला

अशातच साहेबांचा फोन आला

सिमेवर चकमक सुरू झाली

आणि पुन्हा मी तसाच निघालो

काही न बोलता

पण मागे वळून पाहू शकतं नव्हतो लेकराला


पोरगा तसाच धावत आला

पायाला बिलगला

आणि म्हणाला

बाबा तुम्ही जावूच नाका

म्हणजे आईला पाढंर कपाळ करून

आरशात बघावं लागणार नाही

कारण तुम्ही गेल्यावर

आई स्वतःच्या जीवापेक्षा

कुंकू जपुन ठेवते

दारात उभी राहुन

तुम्ही येण्याची वाट बघते


अश्र डोळ्यातून येवू न देता

मुलाला मिठीत घेवून सांगितले

तुला जशी आईची गरज आहे

तशीच भारत मातेला माझी गरज आहे

परत आलो तर

भारत मातेच्या कपाळाचे कुंकू

तुझ्या आईच्या कपाळी लावणार

त्यानंतर घरात आरसा

कधीच नाही दिसणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational