कस्तुरी परिमळ मातीचा
कस्तुरी परिमळ मातीचा
तप्त अशा भूवरती जेव्हा
झरझर जलधारा बरसती
आनंदी मन करे सुगंधी
कस्तुरी परिमळ मातीचा
लागे जणू टाळी ब्रम्हानंदी
कैक अत्तरे पडती फिके
सुगंधी या मृद्गंधा पुढती
परिमळ अुनपम असा
हवाहवासा सर्वांना वाटे
तृषार्तास पाऊस हा जसा
वारेमाप धावे खोंड मग
हुंगुन होत मग बेधुंद ते
ठावत्याचा तेही घेऊ पाही
कस्तुरीमृगालाही कळेना
नाभित कस्तुरी त्याच्या राही
