कस्तुरबा गांधी...
कस्तुरबा गांधी...
कस्तुरबा पुण्यतिथी
फेब्रुवारी बाविसला
काव्यातून श्रद्धांजली
शब्द शब्द ओघळला.......१!!
पत्नी महात्मा गांधींची
सुपरिचित जगतात
श्रेष्ठ दाम्पत्य जीवन
दिसे त्यांच्या चरित्रात......२!!
साधी राहणी सदैव
उच्च विचार सरणी
कस्तुरबा स्मरणार्थ
पुष्प वाहते चरणी.....३!!
देशसेवा आणि धर्म
बापुसंगी कार्यरत
आमरण उपवासी
केली बापूची संगत........४!!
सत्याग्रह स्त्रीसंबधी
गांधींजींनी घडविला
त्यात स्वेच्छेने बानेही
सहभाग नोंदविला........५!!
कस्तुरबा बा देशाची
देशभक्त सर्वगुणी
देशातील सर्वानीच
राहा त्यांचे सदा ऋणी.........६!!
