STORYMIRROR

Sunita Ghule

Tragedy

4  

Sunita Ghule

Tragedy

कष्टणारे हात

कष्टणारे हात

1 min
398

कष्टणारे हात


कष्ट करणारे हातच सुंदर

शिकवून जातात जगण्याचे मोल

कर्मातच सुखाचे गुपित लपले

हरामाचे जीणे खरंच फोल।


गरीबीतही जगण्याची उमेद

टिकवून ठेवतात राबणारे हात

कुटुंबाचे आधारस्तंभ बनावेत

संस्कार अनमोल मोती त्यात।


जरी असलो बालक आम्ही

कष्टाचा वाटा उचलू पुरेसा

आईवडिलांना करून मदत

श्रमप्रतिष्ठेचा बाळगू वसा।


आनंद मिळवू घामाच्या भाकरीत

हात मळतील,घट्टे पडतील

अनुभवाचे मूल्य सरसचं

कृतीतून साऱ्या जगास सांगतील।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy