क्षणभर विश्रांती
क्षणभर विश्रांती
आई रिटायर कधीच होत नाही.
साऱ्या प्रपंचाची दोरी ओढतच राही.
क्षणभर विश्रांती ठावूकच नाही.
मशीन की माणूस कळेल का? काही.
सोळाव्या वयात संसार सुरू झाला.
नंदा,दिर,पाच,सहा, सात वर्षाचे तेव्हा.
सासरा भ्रम्हीसटाने घरात फिरे सदा.
नववधू डोळे पाणावत पाहे तेव्हा.
क्षणभर ही मन विचलीत केले नाही.
शिक्षण,संसार सुखाचा करण्यात मग्न.
वहिणीच्या बांगड्या गाथा तिचीच.
क्षणभर विश्रांती न अपेक्षा भग्न.
जावूबाई तोऱ्यात,केला संसार वेगळा.
माहेरचीच नाते जपे घाट सगळा.
आई नवऱ्याच्या इच्छेत रंगली.
गणगोतास मदतीचा हात देत सकळा.
छोटी सुनबाई आली, पीएचडी घेत.
धन्यास हातात विजेचा झटका.
मुलीला कर्करोगाचा चटका.
मित्रांच्या नादी लेक काढी लचका.
शरीर लटपट स्वैपाक करत राही.
क्षणभर विश्रांतीस विसरला काही.
सत्व परिक्षा तिची काही सरतच नाही.
सत्व आहे त्याचीच परिक्षा घेतच राही.
