STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

क्षणाक्षणाने काळ धावतो

क्षणाक्षणाने काळ धावतो

1 min
343

माणूस असो वा असो घड्याळ

कोणालाही सुटका नाही

क्षणाक्षणाने काळ धावतो

कोणासाठी थांबत नाही


काळ-काम-वेगाचे तुम्ही

गणितही साधावे

बदलत्या जगाबरोबर

स्वतःच बदलावे


तरच तुमचा टिकाव येथे

अन्यथा जगणे थांबून जाई

क्षणाक्षणाने काळ धावतो

कोणासाठी थांबत नाही


बंद पडलेले घड्याळही येथे

कधीकधी कामासच येते

दिवसातून दोन वेळा

तरीही अचूक वेळ दाविते


घड्याळा पासून माणसाने

शिकून घ्यावे थोडे काही

क्षणाक्षणाने काळ धावतो

कोणासाठी थांबत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational