क्षण
क्षण
भरभरून जगताना
क्षण काही राखून ठेवायला हवेत
वेगळेपणाची खूण जपत
हृदयात निरंतर सांभाळायला हवेत
जाणिवेच्या अत्तराचे
सुगंधक्षण भाळून जायला हवेत
नेणिवेचे काही अंतर्मुख
ते स्मरणसुखात भिजायला हवेत
भरतीच्या असंख्य क्षणांना
मर्यादांचे काठ स्पर्शायला हवेत
ओहोटीचे कातरक्षणही
मन:स्पर्शाने सुखात न्हायला हवेत
चेतनेचे दिव्य क्षण
अनुभवात परिपूर्ण रमायला हवेत
प्रचितीचे मागे उरले क्षण
पुन:पुन्हा तेजाने उजळायला हवेत
