STORYMIRROR

Vaidehi Kulkarni

Others

3  

Vaidehi Kulkarni

Others

ध्यासातला चंद्र

ध्यासातला चंद्र

1 min
189

ध्यासातला चंद्र माझ्या

आहे थांबला त्या तिथे

रम्य वाट नागमोडी 

जाऊन थांबते जिथे


चाले जीवन प्रवास

विसावा स्थान ते आहे

मार्ग भासे जरी सोपा

साध्य ते कठीण आहे


झळा असतील कधी

कधी स्पर्शतील धारा

लख्ख असेल चांदणे

कधी साहणे अंधारा


किती भेटती सोबती

जाती कितीक सोडुनी

वाट नाही सोडायची

आता उगा अर्ध्यातूनी


मार्ग हा सुकर झाला

लाभता सद्गुरुकृपा

ध्यास प्राप्तीचा लागला

परमेशा चंद्ररूपा


साहित्याला गुण द्या
लॉग इन