STORYMIRROR

Vaidehi Kulkarni

Others

3  

Vaidehi Kulkarni

Others

मेघ

मेघ

1 min
167

मेघ आषाढ अंबरी

झुले सुंदर सावळा

धरा आतूर आतूर

तृप्त सुखाचा सोहळा


मन सुखावे पाहता

गिरी हरित जाहला

नदी दुथडी वाहता

क्षिती सुजला सुफला


झळा संतप्त सरल्या

घन सुखाचा वर्षला

बीज अंकूर होताना

गर्भ धरेचा हर्षला


पर्णदेह सुखावून

दवबिंदू साज ल्याला

स्वागताला श्रावणाच्या

राजा निसर्ग सजला


नभातून उतरून

घन खिडकीशी आला

थेंब ओलेते हळवे

मन ओलावून गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन