बालपण
बालपण
बालपण चोरपावलांनी गेलं निघून
जाताना बरंच काही नेलं हिरावून
जबाबदारीच्या जाणिवेनं केलं मोठं
तेव्हा जाणवलं या जगाचं रूप खोटं
कागदी विमान कागदी होत्या नावा
नोटेला किंमत नव्हते गावी तेव्हा
नोटही कागदीच पण नव्हती सहज
घर गाडी पैसा काळाची ती गरज
गरजा तर कधी पूर्ण होतच नसतात
गेलेले आनंद कधी परत मिळतात?
पुन्हा वाटतं थेट तसे पावसाळे यावेत
निरागस क्षण पुन्हा नव्याने अनुभवावेत
