STORYMIRROR

Vaidehi Kulkarni

Tragedy

3  

Vaidehi Kulkarni

Tragedy

बाबा तुमची आठवण

बाबा तुमची आठवण

1 min
217

फादर्स डे असतो हे कळण्याच्याही आधीच

कितीतरी आधीच तुम्ही निघून गेलात बाबा

तुम्हालाही दिल्या असत्या आम्ही शुभेच्छा

तुमच्या चेहऱ्यावरचं वाचलं असतं कौतुक

बाबा तुम्ही होतात दिलखुलास व्यक्तिमत्व

आमचं जगणं आनंदी करणारे एक देवदूत

तुम्ही होता तोपर्यंत सुखाची सावली होती

जगाची झळ कधी सोसावी लागली नव्हती

सुखाची सावली आमच्या मस्तकी होती

उणीव, ददात आम्हाला जाणवत नव्हती

आत्ता quality time चं वारं खूप वाहतंय

पण तुम्ही तो भरभरून आम्हाला दिलात

छोट्याश्या वेळात तुम्ही खूप काही केलंत

कीर्तीरुपे उरण्यासाठी वेगळं काहीच नाही

जे केलंत ते कर्तव्याचं ओझंही न मानता

निरपेक्ष भावनेनं आपलेपणाच्या ओलव्यानं

कितीतरी लोकांच्या मनात आजही आहात

जगणं कोणाचं कोणासाठी थांबत नसतंच

पण ओंजळीतून निसटलेलं, ओघळलेलं

परत कधीच का आयुष्याला मिळत नसतं

तुमच्या देहाने आमच्यात असण्याशिवायही 

मोठे होत गेलोच, जातोय की बाबा आम्ही

पण मनाने तर कधीच दूर नाही ओ तुम्ही

प्रत्येक यशाचा अन कौतुकाचा क्षण येतो

तुमचा आठव डोळ्यात नकळत तरळतो

तुम्ही असतात तर हा विचार मनात दाटतो

मनातला विचार मनात ठेवताना काय होतं

हे जगाला दाखवून न देणं असतं त्रासाचं

सावरलो आहे हे दाखवताना वरवरचं

आतून तुटणं काय असतं ते अनुभवलं

आहे हे आयुष्य छान आहे स्थिर आहेच

पण तुम्ही असतात तर नक्की उत्तम असतं

फादर्स डे निमित्त आठवणींना उजळण्याचं

मनात तुम्ही कायमच आहात आणि रहाल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy