क्षण हे आतुरलेले
क्षण हे आतुरलेले
क्षण हे आतुरलेले
भेटीच्या ओढीने.
नयनी तुझी आस
मनी तुझाच ध्यास.
भेट असते क्षणभर
जीव तुटतो आभाळभर.
बघता क्षणी तुला
स्वर्ग भासतो आयुष्य
नजरेत साठवतो तुला
मनात जपतो तुला...
स्पर्शित चैतन्य तुझे
सार्थक जन्मीचे माझे.
मोरपिसे पापण्यांची
दाटलेले आभाळी डोळे
अर्थ बहुमोल तयांना
वचन त्यात समाधानाचे
क्षण हे आतुरलेले
भेटीच्या ओढीने.
भेट असते क्षणभर
जीव मात्र.
तुटतो आभाळभर.

