क्षण बावरा
क्षण बावरा
तुझ्या भेटीचा क्षण बावरा
लाजवतो मज
हसवतो मज
खट्याळ आहे परिचा
धकधक वाढवून छळतो मज
तुझ्या भेटीचा क्षण बावरा
नटून थटून उभी मी राहते
तरीही भिरभिरते नजर तुला शोधण्यात
जीव माझा कासावीस होतो
दंगले मन वाट तुझी बघण्यात
प्रत्येक पावलात तुझीच चाहूल
तू आलीस की या मनी पेटंणारे काहूर
जीव घेणारी ही असह्य हुरहूर
मिटते क्षणात चेहरा येता समोर तुझा हासरा
तुझ्या भेटीचा क्षण बावरा